ग्रामपंचायत टेटवाली

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार टेटवली गावात सुमारे ५०० ते ६०० कुटुंबे राहतात. एकूण लोकसंख्या अंदाजे २५०० ते ३००० च्या दरम्यान असून त्यामध्ये पुरुष व महिला संख्या जवळपास समसमान आहे. या गावात मुख्यतः आदिवासी (वारली, कातकरी) व काही प्रमाणात कुणबी समाजातील लोक राहतात.

येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती असून भात शेती ही मुख्य पिके घेतली जातात. आदिवासी समाजातील लोक शेतमजुरी, वीटभट्टी कामगार, तसेच बांधकाम क्षेत्रात मजुरी करतात. काही लोक कुक्कुटपालन, बकरीपालन आणि लहान स्वरूपातील व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात.

पावसाळ्यातील काळात येथे निसर्गसंपदा मोठ्या प्रमाणात आढळते. श्रावण महिन्यात, विशेषतः गणपती उत्सवाच्या सुमारास, जंगलात अळंबी (रानमशरूम) उगवतात. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सतत कोसळणारा पाऊस या नैसर्गिक वातावरणात अळंबी मोठ्या प्रमाणावर मिळते. ही भाजी अत्यंत चवदार व पौष्टिक असल्यामुळे स्थानिक बाजारात तिची चांगली मागणी असते.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
३०२९
पुरुष लोकसंख्या
१५१७
महिला लोकसंख्या
१५१२
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
४०८
अनुसूचित जाती (SC %)
०.६%
अनुसूचित जमाती (ST %)
७८.७ %

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही 0नाही 
उपकेंद्र (Sub Center)होय

1

होय
अंगणवाडीहोय

11

होय
प्राथमिक शाळाहोय8होय
माध्यमिक शाळाहोय2होय
उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही  
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रहोय2होय
समुदाय भवन (Community Hall)नाही 0नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय3होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय6नाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय2नाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव:ग्रामपंचायत

टेटवाली

बँकेचे नाव : 

शाखेचे नाव: टेटवाली

अकाउंट नंबर : 

आई एफ एस सी कोड :

पत्ता : ग्रामपंचायत टेटवाली ता. – विक्रमगड, जि. – पालघर (  )