ग्रुप ग्रामपंचायत म्हसरोली

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार म्हसरोलि  गावात सुमारे ३०० ते ३१० कुटुंबे राहतात. एकूण लोकसंख्या अंदाजे १४०० ते १५०० च्या दरम्यान असून त्यामध्ये पुरुष व महिला संख्या जवळपास समसमान आहे. गावात सुमारे ७४० पुरुष व ७५० पेक्षा जास्त महिला आहेत.

या गावात मुख्यतः आदिवासी (अनुसूचित जमाती) समाजाचे प्रमाण जास्त असून सुमारे ७०% पेक्षा अधिक लोकसंख्या ही आदिवासी समाजातील आहे (वारली, कातकरी इ.).

येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती असून भात शेती हे मुख्य पीक घेतले जाते. याशिवाय अनेक लोक शेतमजुरी करतात तसेच काही लोक बांधकाम क्षेत्रात व इतर ठिकाणी मजुरी करून उदरनिर्वाह करतात. गावातील काही लोक लहान व्यवसाय, पशुपालन यामधूनही उत्पन्न मिळवतात.

गावात एकूण साक्षरता दर सुमारे ६७% असून पुरुष साक्षरता महिलांपेक्षा जास्त आहे.

लोकसंख्येची माहिती

क्रमांक क्षेत्र तपशील
एकूण लोकसंख्या
1490
पुरुष लोकसंख्या
740
महिला लोकसंख्या
750
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
210

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही 0नाही 
उपकेंद्र (Sub Center)होय

1

होय
अंगणवाडीहोय

11

होय
प्राथमिक शाळाहोय8होय
माध्यमिक शाळाहोय2होय
उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही  
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रहोय2होय
समुदाय भवन (Community Hall)नाही 0नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय3होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय6नाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय2नाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव:ग्रामपंचायत म्हसरोली

बँकेचे नाव : महाराष्ट्र ग्रामीण बँक 

शाखेचे नाव: बोईसर 

अकाउंट नंबर : 55629050813

आई एफ एस सी कोड : MAHG0005629

पत्ता : ग्रामपंचायत म्हसरोली ता. – विक्रमगड, जि. – पालघर ( 421303)